ART FEST 2015 - About

आर्ट फेस्ट 2015
प्रदर्शना विषयी -
आमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या संकल्पनेतून आर्ट फेस्ट 2015 हा आगळा वेगळा कला प्रदर्शनाचा प्रस्ताव आमच्या समोर आला. ज्यात वयाचे बंधन नाही, कला विषयाचे बंधन नाही, सर्जनशील मनाची आणि मेहनतीच्या हातांची ती अभिव्यक्ती आहे. कारण वरिष्ठ व सुप्रसिध्द कलाकारांचेी कला प्रदर्शने आपण नेहमीच पहात असतो आणि आस्वाद घेत असतो. पण असेही काही कलाकार असतात. जे प्रसिध्दी पासून दुर असतात, काही कलाकार हौस किंवा छंद म्हणून तर काही विरंगुळा म्हणून कला साधना करित असतात. तर काही नवोदित कला विद्यार्थी असतात. यात या सर्व मंडळींनीही आपलेही प्रदर्शन भरावे असे स्वप्न पाहीलेले असतात. पण त्यांना त्यासाठी ब-याच अडचणी असतात. त्यामुळे त्यांच्या कलाकृती ब-याचदा आंधारातच राहतात. अशाच अडगळीतल्या कलाकृती आणि प्रसिध्दी पासून दुर असलेल्या कलाकारांच्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा आम्ही विचार केला.
आमच्या संस्थेच्या कलाकार सभासदामध्ये डॉक्टर, इंजिनियर, एम.बी.ए.,कला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच जेष्ठ नागरीक आणि गृहिणी आहेत. मेहेंदीकाम, मिरर वर्क, वारली, पेपर फलावर, ओरीगामी, ग्रिटींग्ज, पेंटींग, रांगोळी सिरॅमीक्स, क्ले पॉटेरी, क्रिस्टल वर्क, छायाचित्रण कला आणि सॅलॅड डेकोरेशन आर्ट अशा विविध कला विषयाचे निष्णात कलाकार आहेत.
प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संस्थेतील विविध वयाचे, वेगवेळया प्रदर्शन प्रवाहाचे आणि वेगवेगळया कला अविष्कार जोपासणारे नवोदित कलावंत जे आपापले व्यवसाय नौकरी सांभाळून रोज दोन ते तीन तास सतत कलेची उपासना करीत असतात. अषा सर्व सृजनशील माणसांच्या कल्पक कलाकृतींचे प्रस्तूती करणे होय.
आमच्या संस्थेच्या धुळे, जळगाव, अहमदनगर, आणि पुणे जिल्हयातील कलाकार सभासदांमधून काही निवडक, नवोदित तसेच जेष्ठ कलावंताचे कला प्रदर्शन आर्ट फेस्ट 2015 हे पुण्यात बालगंधर्व चौक तील राजा रवी वर्मा कलादालनात दिनांक 17 ते 19 ऑक्टोबर या काळात कलारसीकांसाठी उपलब्ध असणार आहे.
तरी आपणा सर्वांना या प्रदर्षनाच्या निमित्ताने आग्रहाचे निमंत्रण आहे.
प्रकाशक
खेमचंद खैरनार
विशाल खैरनार
पुणे




Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment